चीनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरल्यामुळे महिलांना तुरुंगवास

    दिनांक :13-Oct-2021
|
बीजिंग, 
चीनमध्ये मुस्लिम महिलांना व्हॉट्सअ‍ॅप वापरल्याबद्दल तुरुंगात डांबण्यात येते. ‘इन दी कॅम्पस् : चीन्स हाय-टेक पिनल कॉलोनी’ या एका नवीन पुस्तकात मुस्लिमांवरील होणार्‍या अत्याचाराबाबत नवा खुलासा समोर आला आहे.
 
intre_1  H x W:
 
चीनचे कम्युनिस्ट सरकार मुस्लिम महिलांना व्हॉट्सअ‍ॅप वापरल्याबद्दल ताब्यात घेत आहे. सरकारी भाषेत या महिलांना ‘प्री-कि‘मिनल्स’ म्हटले जाते. यापूर्वीही चीनची मुस्लिमविरोधी विचारधारा अनेक वेळा उघड झाली आहे. चीनमध्ये उईगर मुस्लिम नागरिकांना मोठ्या प्रमाणात अत्याचारांचा सामना करावा लागतो. या पुस्तकात वॉशिंग्टन विद्यापीठाची विद्यार्थिनी वेरा झोऊ हिच्या प्रकरणाचे उदाहरण देण्यात आले आहे. वेराला नुकतेच तिच्या शाळेचे जीमेल अकाऊंट वापरल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले. चीनमधील शिनजियांग येथे तिने गृहपाठ दाखविण्यासाठी जीमेल अकाऊंट उघडले होते.
 
 
बिझनेस इनसायडरमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, वेरा झोऊने सांगितले की, तिला ताब्यात घेतल्यानंतर रि-एज्यूकेशन वर्गात पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वेरा कित्येक दिवस कैदेत होती. 2018 मध्येही वेराने नवीन वर्ष कैदेत घालविले होते. वेरा झोऊ सुमारे 6 महिने कैदेत होती. या पुस्तकात वेरा झोऊशिवाय 11 इतर मुस्लिम महिलांचा उल्लेख असून त्यांना पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप वापरल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.