ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

    दिनांक :24-Nov-2021
|
लंडन,
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी आरोग्य क्षेत्रात एक अब्ज पौंड्स म्हणजेच 1.3 अब्ज डॉलर्स इतकी नव्याने गुंतवणूक केली आहे. अ‍ॅस्ट्राजेनेका संशोधन आणि विकास सुविधेच्या माध्यमातून कंपनीने औषध निर्मितीला चालना देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
 
intre_1  H x W:
 
अ‍ॅस्ट्राजेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित केलेल्या कोविड-19 लसीच्या दोन अब्ज मात्रा पुरविल्या आहेत. कोरोनाविरुद्ध प्रतिबंधात्मक अँटीबॉडी कॉकटेल बाजारात आणण्याचा विचारही कंपनी करीत आहे. कंपनी कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लस आणि थेरपीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आहे. संशोधनाच्या इतर क्षेत्रांचादेखील विस्तार केला आहे.
 
 
केंब्रिजमधील नवीन डिस्कव्हरी केंद्रात रोग जीवशास्त्र समजून घेण्यास मदत होणार आहे तसेच यामुळे नवीन मर्यादा निश्चित होतील. एवढेच नाही तर, रुग्णांसाठी जीवनावश्यक औषधे आणण्यात आणि कंपनीची क्षमता वाढण्यातही हे केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी एका निवेदनात म्हटले आहे.