पाकिस्तान कंगाल, देश चालवायला पैसे नाहीत

इम्रान खान यांची कबुली
इतर देशांकडून घ्यावे लागते कर्ज

    दिनांक :24-Nov-2021
|
इस्लामाबाद,
पाकिस्तान कंगाल झाला असून, आपल्या कार्यकाळात देशाची आर्थिक स्थिती अत्यंत खालावल्याची कबुली पंतप्रधान इम्रान खान यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. देश चालवण्यासाठी सरकारकडे पैसेच नाहीत, त्यामुळे इतर देशांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. पाकिस्तानच्या डोक्यावर वाढणारे विदेशी कर्ज आणि घटलेले करसंकलन राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा झाला आहे. नागरिकांच्या कल्याणावर खर्च करण्यासाठी पुरेशी संसाधने सरकारकडे उपलब्ध नाहीत, असे इम्रान खान यांनी सांगितले.

intre _1  H x W
 
कर न देण्याच्या संस्कृतीचा फटका
फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या पहिल्या ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस यंत्रणेचे उद्घाटन इम्रान खान यांच्या हस्ते झाले. पाकिस्तानमध्ये कर न देण्याची संस्कृती तयार झाली असून, त्याचा फटका देशाला बसला आहे. सरकार आपल्यावर पैसे खर्च करीत नसल्याचे नागरिकांना वाटते. त्यामुळे ते कर देण्यास तयार नसतात. तंबाखू, खते, साखर आणि सिमेंटसह महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील उत्पादन आणि विक्रीवर ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेसच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, असे खान म्हणाले.
 
खापर फोडले विरोधकांवर
पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे खापर इम्रान खान यांनी विरोधकांवर फोडले आहे. 2009 ते 20918 या कालावधीत सत्तेत असलेले राजकीय पक्ष संसाधने निर्माण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागला. सत्ता असताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते, असे इम्रान खान यांनी सांगितले.
 
 
बि‘टनमधील राजकीय नेत्यांचा आदर्श ठेवा
ब्रिटनमधील राजकीय नेते नागरिकांच्या पैशांबाबत संवेदनशील असतात. मात्र, पाकिस्तानचे नेत्यांमध्ये असा गुण दिसत नाही. त्यांनी बि‘टनच्या राजकीय नेत्यांचा आदर्श ठेवावा. पाकिस्तानच्या तुलनेत 50 पटीने जास्त उत्पन्न असलेल्या ब्रिटनचे मंत्री विदेश दौर्‍यावर जातात, त्यावेळी ते इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात. पैसे वाचवण्यासाठी बि‘टनच्या दूतावासात वास्तव्य करतात. दुर्दैवाने पाकिस्तानात अशी संस्कृती तयार झाली नाही, असे इम्रान खान यांनी सांगितले.