गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :24-Nov-2021
|
 gambhir_1  H x
 
नवी दिल्ली,
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गंभीरनं दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिली आहे. गंभीरच्या या तक्रारीनंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गंभीरनं मंगळवारी रात्री ही तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी यांनी दिली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ईमेल आणि फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गंभीरनं केली आहे.गंभीरनं 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या तो पूर्व दिल्लीचा (East Delhi) भाजपा खासदार आहे.
 

sam _1  H x W: