जम्मू-काश्मिरात तीन अतिरेक्यांचा खात्मा

    दिनांक :24-Nov-2021
|
श्रीनगर,
येथील रामबाग परिसरात आज बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. चकमक थांबली असली तरी, सुरक्षा दलाची कारवाई सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी तीन अतिरेकी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
natre6_1  H x W
 
रामबाग परिसरात अतिरेकी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलाने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल फास आवळत असल्याचे पाहताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि शोधमोहीम चकमकीत बदलली. जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांचा सहभाग असलेल्या संयुक्त पथकाने सर्वप्रथम या परिसरातील वाहतूक बंद करून अतिरेक्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. मेहरान आणि बासित अशी ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे असून, ते द रेजिस्टन्स फोर्सचे असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तिसर्‍या अतिरेक्याची ओळख पटू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.