ट्रकचा व कारच्या भीषण अपघातात 5 जखमी तर 3 गंभीर

    दिनांक :25-Nov-2021
|
गडचिरोली,
अहेरी चंद्रपूर मार्गवरील लगाम गावातील पी.एच. सी मार्गावर सुरजागड लोहप्रकल्पाच्या खनिजांची वाहतूक करणारा त्रिवेणी कंपनीचा ट्रक व हुंडई वेन्यू या कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील 3गंभीर तर 2 जखमी झाले आहेतही घटना काल बुधवारी रात्रीं 11 वाजताच्या दरम्यान घडली आहे. ट्रक आणि भरधाव कारची समोरासमोर टक्कर होऊन कारमधील २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री मूलचेरा तालुक्यातील लगाम येथे घडला.
 
 
accident_1  H x
 
प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ओडी ०९, एच ००५६या क्रमांकाचा ट्रक येत होता तर, गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच ३३, व्ही ६०१८) जात होते. दरम्यान, लगाम येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले. त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या कारमध्ये गडचिरोली येथील सुमित गंधेवार (वय २८), त्यांची पत्नी रिया गंधेवार (वय २५) या दाम्पत्यासह त्यांच्या मित्राची पत्नी व त्यांची दोन मुले असे ५ जण होते.
जखमीना तत्काळ उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
 
वृत्त असेंकि एटापली-आलापल्ली मार्गाकडून त्रिवेणी कंपनीच्या ट्रक क्रमांक od9h 0056 हा सुरजागड लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक हा गडचिरोली वरून आलापल्ली कडे येणार्या हुंडई वेन्यू क्रमांक Mh33v 6018 लगाम जवळ जबर धडक दिली यात कारमधील 5 पैकी 4 जण जखमी झाले आहेत यामध्ये आहे.. मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब हेमलकसा येथे जाणार होते वाटेत आलापल्ली येथे मुक्काम करून उद्या हेमलकसा येथे जाण्याचा कार्यक्रम होता.अपघात होताच ट्रक चालक उडी मारून फरार झाला असल्याची माहिती मिळत आहे..लगाम वासीयांना अपघातां ची माहिती होताच रुग्णवाहिका बोलावून जखमींना चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती मिळत आहे.