अभिषेक बच्चन झाला 100 किलोंचा

    दिनांक :25-Nov-2021
|
मुंबई,
'बॉब बिस्वास' या आपल्या आगामी सिनेमासाठी अभिषेक बच्चनने जेवढे कष्ट घेतले आहेत, त्यासाठी त्याचे खूप कौतुक केले जात आहे. या सिनेमासाठी त्याचे वजन 100 किलोपेक्षा जास्त झाले होते. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन अगदी गुबगुबीत दिसतो आहे. त्याचे गाल वर आले आहेत. ढेरी सुटली आहे. हे वजन केवळ शूटिंग पुरते वाढवले गेले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जेव्हा शूटिंग थांबवले गेले होते, तेव्हा हे वाढलेले वजन टिकवण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती.
 
 
abhishek_1  H x
 
हे वजन वाढवणे एकवेळ सोपे आहे, पण ते तसेच टिकवून ठेवणे आवघड आहे हे त्याच्या लक्षात आले. जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा कोलकात्यात शूटिंग सुरू होते. तोपर्यंत 80 टक्के शूटिंग पूर्ण झाले होते. केवळ 10-15 दिवसांचे शूटिंग शिल्लक होते. मात्र, त्यासाठी हे वाढवलेले वजन पुढे 3 महिने टिकवून ठेवायला लागले होते. डायरेक्‍टर दिव्या घोषच्या सूचनेनुसार प्रोस्थेटिकचा वापर करणे त्याने टाळले. कारण ते लगेच ओळखू येते. पण नैसर्गिक वजन वाढवल्यामुळे संपूर्ण देहबोली बदलून जाते. अभिषेकला हा नैसर्गिक बदलच अपेक्षित होता.