काल तू वाचलास... गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमकीचा दुसरा मेल

    दिनांक :25-Nov-2021
|
नवी दिल्ली,
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना देण्यात आलेल्या धमकीचा ई मेल पाकिस्तानातून पाठवण्यात आसल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर त्यासोबत गौतम गंभीर याच्या घराबाहेरील व्हिडिओ पाठवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
 
 
gautam_1  H x W
 
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याच वेगाने तपास करण्यात आला. गुगलकडून मागवलेल्या माहितीत हा ई मेल पाठवला त्या संगणकाचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. गंभीर यांना मंगळवारी धमकीचा पहिला मेल आला होता. बुधवारी त्यांना दुसरा मेल आला. त्यात काल तु वाचलास पण काश्‍मिरच्या मुद्द्यापासून दूर रहा अशी धमकी देण्यात आली आहे. या ई मेल सोबत त्याच्या घराबाहेरचे चित्रिकरण केलेला व्हिडिओ पाठवण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
 
 
हा ईमेल इसिस काश्‍मिरने पाठवल्याचा दावा गंभीरने केला आहे. गंभीरच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात अद्याप कोणआही अटक केलेली नसली तरी, आरोपींच्या मुसक्‍या आवळू असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.