पेगॅससप्रकरणी ‘अ‍ॅपल’चा खटला

    दिनांक :25-Nov-2021
|
नवी दिल्ली,
पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ‘एनएसओ ग्रुप’ या इस्रायली कंपनीविरुद्ध अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी खटला दाखल केला. पत्रकार, वकील, राजकीय नेत्यांचे आयफोन हॅक करून हेरगिरी केल्याच्या आरोपप्रकरणी ‘अ‍ॅपल’ने हे पाऊल उचलले. ‘अ‍ॅपल’ने कॅलिफोर्नियाच्या स्थानिक न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.
 
 
apple_1  H x W:
 
जगभरातील आयफोन वापरकर्त्यांना हेरगिरीद्वारे लक्ष्य करण्यास ‘एनएसओ ग्रुप’ला मज्जाव करण्याची ‘अ‍ॅपल’ची भूमिका आहे. २०१८ सालच्या १.७ दशलक्ष आयफोनच्या तुलनेत अ‍ॅपलने २०२० साली सुमारे ३.२ दशलक्ष आयफोन भारतात पाठवले. पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञान हे अ‍ॅपलच्या उपकरणांना इतर उपकरणांपेक्षा (उदा. अँड्रॉईड) अधिक प्रभावीपणे लक्ष्य करते, असे संशोधनात आढळले आहे. ‘एनएसओ ग्रूप’ला अ‍ॅपलचे कुठलेही सॉफ्टवेअर, सेवा किंवा उपकरणे वापरण्यापासून कायमची मनाई करावी, अशी मागणी असल्याचे ‘अ‍ॅपल’ने म्हटले आहे.