सहकार भारतीची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

    दिनांक :25-Nov-2021
|
बुलडाणा,
सहकार भारती बुलडाणा जिल्हा कार्यकारिणीची बैठक जनकल्याण नागरी पतसंस्थेत 24 नोव्हेंबर रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष गणेश वायकोस होते. तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुदर्शन भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.व्ही.डी.पाटील, संघटन मंत्री विलास भडाईत, महामंत्री कमलकिशोर लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
shankar_1  H x
 
लक्ष्मीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने बैठकीला प्रारंभ झाला. सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे जनकल्याण पतसंस्थेच्या वतीने पुष्पगूच्छ देवून स्वागत करण्यात आले. बैठकीत सदस्य संख्या वाढ, प्रशिक्षण वर्गाचे आयोजन तसेच तालुकास्तरीय कार्यकारिणीचे गठन या विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सुदर्शन भालेराव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सहकार भारती ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संघटना असून देशात सदस्य संख्येत क्रमांक 1 वर आहे. सहकार भारतीच्या वतीने सहकाराशी संबंधित सर्व संस्थांना व त्यामध्ये काम करणार्‍या संचालक व कर्मचार्‍यांना सदस्य करायचे आहे. त्यासाठी जिल्हा कार्यकारिणीने पुढाकार घ्यावा.
 
 
बैठकीचा समारोप अ‍ॅड.व्ही.डी.पाटील यांनी केला. तर संचलन रविंद्र गणेशे यांनी केले. बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे जनार्दन टेकाळे, सौ.मनिषा बोंद्रे, देविदास हिवरकर, एकनाथ काळे, मनोहर खडके, दिपक बाभूळकर, मंगेश वाघ, विष्णू अंबासकर, अशोक कुळकर्णी, शिवाजी तायडे, विजय पाटील, विश्राम पवार, दिलीप नेमाडे उपस्थित होते.