नाली दुरुस्ती काम त्वरीत पूर्ण करा; अन्यथा आंदोलन

शिवरत्न मित्रमंडळाचा इशारा

    दिनांक :25-Nov-2021
|
मंगरूळनाथ,
वर्दळीच्या रस्त्यात खोदकाम केल्यामुळे महिनाभरापासून वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सदर काम लवकरात लवकर दिवसात पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवरत्न मित्रमंडळाच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. येथील नगरपालिका हद्दीतील बिरबलनाथ मंदिराजवळील मंदिराकडे येणारा व दादा हयात कलंदर दर्गाह कडे जाणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर रत्नपारखी यांचे ज्वेलर्स समोर नाली वजा रपटा आहे.
 
 

nali_1  H x W:
 
सदर रस्त्याचे खोदकाम पालिकेने करून ठेवले असून, खोदकाम केलेले साहित्य त्याठिकाणीच पडून असल्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. त्यामुळे याठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. खोदकाम केलेले काम अजूनही पूर्ण केले नाही. त्यामुळे तिर्थक्षेत्र तथा पर्यटनस्थळ असलेल्या योगतपस्वी संत बिरबलनाथ महाराज व दादा ह्यात कलंदर दर्ग्यात येण्याच्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
 
याबाबत शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल रघुवंशी व सचिव सचिन उर्फ बाळा मांढरे यांच्यासह युवकांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन तीन दिवसाचे आत खोदकाम केलेले काम पूर्ण करून साहित्य उचलून घ्यावे, अन्यथा नगर पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शक्ती सुळके, हितेश मेहता, उन्मेष भोजने, केतन सुखाडिया, मनोज काटकर, पप्पू ठाकूर, संतोष मांडवगडे, इरफानभाई, गोटू ठाकूर, अशोक कडुकार, सुनील साठे, रवी गोतरकर आदींची उपस्थिती होती.