दिल्लीत 106 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

    दिनांक :25-Nov-2021
|
नवी दिल्ली, 
देशाच्या राजधानीमध्ये दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 106 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, द्वारका जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने 10.688 किलो वजनाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या संपूर्ण कारवाईचा तपशील दिल्ली पोलिसांनी अद्याप दिलेला नाही.

natre _1  H x W
 
विशेष म्हणजे, द्वारका परिसर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने द्वारका जिल्हा पोलिसांनी नुकतेच ऑपरेशन प्रवेश सुरू केले होते. ही कारवाई सुरू झाल्यापासून अल्पावधीतच अनेक गुंड, स्नॅचर लुटारूंना अटक करण्यात आली आहे. या परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवरही पोलिसांची करडी नजर आहे. याआधी पाच दिवसांपूर्वी २० नोव्हेंबरला याच जिल्ह्यात नायजेरियन नागरिकाला २ कोटी रुपयांच्या हेरॉईनसह पकडण्यात आले होते.