वाकलेल्या वीज वाहक खांबामुळे गंभीर अपघाताची शक्यता

दीड वर्षापूर्वी प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही गंभीर डोळेझाक

    दिनांक :25-Nov-2021
|
मानोरा,
तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वाईगौळ या गावातील वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या अखत्यारीतील वीज वाहक तारांचे खांब घरावर वाकलेले असल्याने सदरील धोकादायक खांब तातडीने हलविण्याच्या केलेल्या मागणीला वीज वितरण कंपनी प्रशासन केराची टोपली दाखवित आहे.
 
 
khamb_1  H x W:
 
नागरिकांना घरगुती वापरासाठी आणि शेती सिंचनासाठी तथा पेयजल योजना राबविण्यासाठी वीज मिळावी याकरीता पोहरादेवी येथे वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन उभारण्यात आलेले असून, या सबस्टेशन वरून पोहरादेवी, उमरी खुर्द, वाईगौळ या तीर्थक्षेत्रासोबतच विस पेक्षा अधिक तांडे, पाडे, गावांना वीज वितरीत केली जाते. विजेचे वहन करण्यासाठी वितरण कंपनी द्वारा अनेक वर्षांपूर्वी वाई गौळ या गावी रोवण्यात आलेले लोखंडी खांब छतीग्रस्त होऊन रायसिंग काळू जाधव या नागरिकाच्या घरावर वाकलेले असल्याने खांब पडण्याची भीती या नागरिकाच्या कुटुंबीयांना सतत सातवीत असते. वाकून धोकादायक अवस्थेत पोहोचलेल्या या वीज वाहक खांबाची पाहणी करून सदरील खांब बदलवण्याची लेखी मागणी सव्वा वर्षापूर्वी करूनही वीज वितरण कंपनी प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होत नसल्याने वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह या निमित्ताने निर्माण झालेले आहेत.