भास्करराव पेरे यांचे वाशीममध्ये जाहीर व्याख्यान

आम्हीच करु आमच्या गावाचा विकास

    दिनांक :25-Nov-2021
|
वाशीम,
संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात ग्राम पाटोदा या गावाला संपूर्ण देशभरात एक वेगळी ओळख निर्माण करुन देणारे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे वाशीम येथील टिळक स्मारक भवन येथे 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन वत्सगुल्म युवा प्रतिष्ठाण च्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
pere_1  H x W:
 
आम्हच करु आमच्या गावाचा विकास.... हाच ध्यास ठेवून भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम पाटोदा गावाला विकासाच्या बाबतीत एक आगळी वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यांच्या या कर्तुव्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्मविर सरपंच, आपल्या कर्तुत्वाच्या व वक्तृत्वाच्या जोरावर अख्या महाराष्ट्रात भास्करराव पेरे पाटील यांनी नावलौकीक मिळविला आहे. आपण आपल्या गावाचा विकास करु शकतो, हे भास्कराव पेरे पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी या व्याख्यानरुपी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वत्सगुल्म युवा प्रतिष्ठाण च्या वतीने करण्यात आले आहे.