धक्कादायक...काश्मीरमध्ये १९९ दहशतवादी सक्रिय

    दिनांक :25-Nov-2021
|
श्रीनगर,
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी  कारवाया सुरूच आहेत. सध्या काश्मीर खोऱ्यात सुमारे १९९ दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. यातील ११० दहशतवादी स्थानिक तर ८९ परदेशी आहेत. काश्मीर खोऱ्याशी संबंधित अनेक गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा हवाला देत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, खोऱ्यात एकूण १९९ दहशतवादी सक्रिय आहेत. त्यात ११० स्थानिक आणि ८९ परदेशी आहेत. तर या वर्षी २४ नोव्हेंबरपर्यंत, खोऱ्यात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्करासोबत झालेल्या चकमकीत १४८ दहशतवादी मारले गेले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

teri _1  H x W:
 
ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी १२७ स्थानिक तर २१ परदेशी आहेत. पुढे अधिकाऱ्यानं म्हटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात CRPF चे जवान तैनात करण्यात आले आहेत. खोऱ्यात सुमारे ६५,००० CRPF जवान तैनात आहेत. याशिवाय खोऱ्यातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या अतिरिक्त २५ कंपन्याही तेथे तैनात करण्यात आल्या आहेत. CRPF च्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यावर्षी दहशतवाद्यांशी लढताना एकूण 11 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. गेल्या सात दिवसांत एकूण २७ डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांना पकडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये छत्तीसगडमधून १३, बिहारमधून ३ आणि झारखंडमधून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.