शाळा सुरू मात्र एसटी बंद

    दिनांक :25-Nov-2021
|
चिखली,
दिवाळीनंतरच्या दुसर्‍या सत्रातील शाळांना चिखली तालुक्यात सोमवारपासून सुरुवात झाली आहे. परंतु, मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप असल्यामुळे लाल परीची चाके जागीच थांबली आहेत. त्यामुळे दिवाळीतही अनेक प्रवासी व महिलांना खासगी वाहनाने प्रवास करत माहेरची वाट धरावी लागली. शाळा सुरू झाल्या असल्या तरी मात्र एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. याचाच परिणाम शाळेच्या उपस्थितीवर झाला आहे.
 
 
st_1  H x W: 0
 
मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे एसटीची सेवा पूर्णता ठप्प पडली आहे. परंतु अद्यापही शासनाकडून या संपावर कुठलाच तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाचा फटका22 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी ही बसत आहे. ग्रामीण भागात एसटी बसेस बंद असल्याने विद्यालयात पर्यंत पोहोचण्यास अनेक विद्यार्थ्यांना अडचणी होत आहे. तर काही विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेपर्यंत पोहोचले. वास्तविक पाहता मानव विकास बसेसच्या माध्यमातून अनेक मुली या विद्यालयात येत असतात. परंतु एसटी बस बंद असल्याने त्यांना ही मोठी अडचण झाली असून त्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यात अडचणी झाली आहे. एकंदरीत या बंदचा फटका शाळेमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला बसला आहे.