'शुध्द हवा आपला हक्क' ही जनचळवळ उभी व्हावी

इको प्रोच्या "हवा प्रदूषणावर" चौपाल चर्चा"
डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले मत

    दिनांक :25-Nov-2021
|
चंद्रपूर,
महानगरातील प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी इको-प्रो व वातावरण फाउंडेशनच्या वतीने सावरकर चौकात कृत्रिम फुफुस लावण्यात आले आहे. चंद्रपुरातील वायु प्रदूषणाची तीव्रता याद्वारे मोजण्यात येत आहे. मागील 7 दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या या पांढराशुभ्र कृत्रिम फुफ्फुसाचा रंग आता काळा होऊ लागला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, 'प्रदूषण आणि आपले आरोग्य' या विषयावर गुरुवारी सकाळी इको-प्रोच्या माध्यमातून चौपाल चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे.
 
 
air_1  H x W: 0
 
चंद्रपूरची प्रदूषित हवा आणि आपले आरोग्य यावर उपस्थित मान्यवरांनी आपापले मत यावेळी मांडले. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना खोकला, दमा, श्वसनाचे आजार होत असून, लहान मुलांनाही विळखा घातला आहे. त्यानंतरही अनेक गंभीर आजार होतात आणि वयाच्या 40 वर्षानंतर अधिक त्रास दिसून येतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
 
 
तर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर अधिक दुष्परिणाम या वायु प्रदूषणामुळे होत आहेत. शहरातील रहदारीतून जड वाहतूक थांबली पाहिजे, वळण मार्ग झाला पाहिजे, वृक्षारोपणावर भर देऊन सायकलिंग वाढवली पाहिजे, शहरात स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुरुवात झाली पाहिजे, रस्ते स्वच्छ करतानाही प्रदूषण होणार नाही, याकडे काळजी घेतली पाहिजे, डोमेस्टिक कोल बर्निंग टाळले पाहिजे, जनप्रितिनिधींनी अधिक जागृतपणे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मतही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी व्यक्त केले.
 
यावेळी डॉ योगेश सालफळे, डॉ प्रवीण पंत, डॉ इरशाद शिवजी, डॉ रफिक मावानी, डॉ अमित देवईकर, डॉ सौरभ राजुरकर, डॉ अनुराधा सालफळे, तर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते किशोर जामदार, सदानंदजी खत्री, प्रशांत आर्वे, राजु जोशी, सुभाष शिंदे, पदमकुमार नायर, तर पत्रकार मजहर अली, संजय तायडे, संजय रामगिरवार, सुनील तायडे, पंकज मोहरीर, रमेश कालेपल्ली तसेच पर्यावरण क्षेत्रातील सुरेश चोपणे, योगेश दुधपचारे, अभय बडकेलवार, नरेश दहेगांवकर, नितीन रामटेके उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन बंडु धोतरे यांनी केले. यावेळी इको-प्रोचे कार्यकर्ते व वातावरण मित्र उपस्थित होते.