महिलांमध्ये आत्मभान जागविण्याची गरज

आज महिला अत्याचार निर्मूलन दिन

    दिनांक :25-Nov-2021
|
नागपूर,
महिला अत्याचार हा कायद्याच्या अभ्यासकांसाठी आणि अंमलबजावणीसाठी कायमच ऐरणीवरचा विषय राहिला आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक कायदे आले. मात्र, अजूनही अत्याचारांचे प्रमाण कमी झालेले नाही. यावर कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीसोबतच महिलांनी स्वत:ला याविषयी जागे करणे आवश्यक आहे. आपल्यावर अत्याचार होतोय् आणि तो सहन केला जाऊ नये, ही जाणीव महिलांमध्ये निर्माण झाली, तरच या कायद्यांचा फायदा होईल, असे सामाजिक तज्ज्ञांचे मत आहे.
 
ngp_1  H x W: 0
 
महिला अत्याचार निर्मूलन दिनाच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, महिला सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यास अपयश येत आहे. 35 टक्के महिला आजही आपल्या जोडीदाराच्या शारीरिक आणि लैंगिक हिंसाचाराला सामोर्‍या जात आहेत, तर सात टक्के महिला इतर कोणाकडून तरी होणार्‍या शोषणाला बळी पडत आहेत. जागतिक स्तरावर 38 टक्के महिलांची हत्या ही त्यांच्याच जोडीदाराकडून होत असते.
 
 
महिलांवरील हिंसाचार म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच स्त्री-पुरुष असमानतेमुळे अनेक भागातील प्रगतीवर परिणाम झाला आणि अडचण निर्माण झाली आहे. या परिस्थितीला आळा घालण्याच्या उद्देशाने पावले उचलण्यासाठी सरकारांना प्रोत्साहन देणे, हे आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिन साजरा करण्यामागचे मु‘य कारण आहे. 20 डिसेंबर 1993 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एक ठराव संमत करून महिलांवरील अत्याचारांचे निर्मूलन याविषयी घोषणापत्र अंगिकारले. त्यानंतर 17 डिसेंबर 1999 रोजी ठराव संमत करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत 25 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा झाली.
 
 
अजूनही जगभरात या दिवशी असं‘य कार्यक्रमांचे आयोजन होत असते. तरीही महिलांना घरात, कार्यालयात, प्रवासात होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी झालेले नाही, ही आजही शोकांतिका आहे.