न्यायधीशामार्फत दंगलीची चौकशी करावी

भाजयुमोचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :25-Nov-2021
|
कारंजा लाड,
त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसतांना अफवा पसरवून नांदेड, अमरावती व मालेगाव येथे दंगली घडविण्यात आल्या. यामध्ये अनेक जण जखमी झाले तर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच निष्पाप लोकांना यामध्ये गोवण्यात येत आहे. उपरोक्त ठिकाणच्या दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात भाजयुमो जिल्हाध्यक्ष विजय काळे, बंटी डेंडुळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केली आहे.
 
 
nivedan_1  H x
 
निवेदनानुसार त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना मशिदांची नासधुस झाल्याची अफवा करून महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती व नांदेड येथे दंगली झाल्या. एका विशिष्ट समाजातील मोठा जमाव रस्त्यावर उतरुन कार्यालये, दुकाने, दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान केले. या विरोधात अमरावती येथे स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी रस्त्यावर उतरले. मात्र, स्वरंक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या एका विशिष्ट समाजातील लोकांनी त्यांचेवर हल्ले केले. या दंगल प्रकरणात पोलिस यंत्रणेकडून पक्षपातीपणाने कार्यवाही केली जात आहे. अफवा पसरवून दंगल करणार्‍यांना पाठीशी घातल्या जात आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
 
 
निवेदनानुसार त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी, दंगल घडविणार्‍या सुत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तात्काळ अटक करण्यात यावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, स्वसंरक्षणासाठी उत्फुर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरीकावरील कार्यवाही करणे त्वरीत बंद करावे, भाजपा नेते व व कार्यकर्त्यावरील कारवाई थाबवुन त्यांच्या विरोधात दाखल केलेल गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.