मंदिराचा स्लॅब पडून युवाकाचा मृत्यू

    दिनांक :25-Nov-2021
|
रिसोड,
माकडाने मंदिराच्या स्लॅबवर उडी मारल्याने स्लॅबसह मंदिर कोसळल्याने एका युवाकाचा मृत्यू झाल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान भाजी मंडी जवळील रत्नेश्‍वर मंदिर संस्थान परिसरात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सुरेश धूत हे सकाळी उठून रत्नेश्‍वर मंदिर परिसरातील खंडू महाराज मंदिरा जवळ दात घासत बसले होते. मात्र, त्यावेळी मंदिर परिसरात माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
 
 
slab_1  H x W:
 
एका माकडाने या मंदिराच्या स्लॅबवर उडी मारली मंदिर हे खूप जुने व जीर्ण अवस्थेत होते. यामुळे माकडाने उडी मारल्याने स्लॅब सह मंदिर कोसळले व खाली बसलेले सुरेश धुत (वय 40 ) त्या खाली आले. ते या मंदिर परिसरातील रहवासी होते. यांच्या अंगावर संपूर्ण मलबा कोसळला यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करीत आहे. सुरेश धूत यांच्या दुर्देवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.