देशीवाद... राखीगढी आणि युवापिढी...!

    दिनांक :25-Nov-2021
|
ऊन सावली
- गिरीश प्रभुणे
 
‘‘इंग्रजांआधी (before british India) आपल्याकडे जाती सतत बदलत होत्या आणि त्या सर्व लहान-मोठ्या लोकसमूहांची एक विशाल व्यवस्था आपोआपच तयार होत होती. जातिव्यवस्थेने मुसलमानांसकट (muslim) सर्व भारतीयांना आपापलं स्थान देऊन आपल्या उपखंडातील लोकशाहीची परंपरा टिकवली आहे.'' ‘‘खरं तर ‘बौद्ध' (Bauddh) आणि ‘हिंदू' (Hindu) हे आपल्या देशी संस्कृतीमध्ये एकमेकांना न मिळणारे आपण आज समजतो तितके परस्परविरोधी ध्रुव होते, असं मला दिसत नाही. आपले नाथ(Nath)-वारकरी (warkari)- महानुभाव (Mahanubhav) -सुफी(sufi) यांच्या उत्क्रांत हिंदू धर्मावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे. फार काय, वैदिक ब्राह्मणी परंपरेनेही स्वतःला वाचविण्यासाठी शाकाहार(vegan)-अहिंसा(non violence)- शांती(peace) अशी बौद्धमूल्य बौद्धांकडूनच उसनी घेऊन बौद्धांपेक्षाही कट्टर वृत्तीने आचरली. उत्क्रांत बौद्ध धर्मातही मोठ्या प्रमाणावर बौद्धपूर्व वैदिक संस्कृतीचा प्रभाव आहे. खरी हिंदू संस्कृती ही पुन्हा हिंदू धर्माव्यतिरिक्त बौद्धादी अनेक धर्मपंथाचाच समन्वय आहे...''
(निवडक मुलाखती-भालचंद्र नेमाडे (bhalchandra nemade) २००८ लोकवा. गृह.) यासारख्या असंख्य विधानांनी समृद्ध मुलाखती या पुस्तकात आहेत.
 

unsa_1  H x W:  
 
इस्लामनंतर ब्रिटिशांच्या प्रभावाखाली भारत आला. इंग्रजांच्या अनेक परंपरा पाळणारा खूप मोठा वर्ग भारतात निर्माण झाला. सामाजिक चळवळी त्यातून निर्माण झाल्या. याच काळात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माक्र्सवादाची लागण याच मेकॉले विद्वानांना झाली. यातून मिश्र मांडणी होऊ लागली. त्याचाच प्रभाव साहित्य, चित्रपट, नाट्य, काव्य यावर झाला. परंतु या इस्लाम आणि ब्रिटिश परंपरा नाकारून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, आर्य समाज, योगी अरविंद, डॉ. हेडगेवार अशा महापुरुषांनी मात्र इस्लाम- ब्रिटिश परंपरा आणि मार्क्सचा मार्ग नाकारून भारतीय परंपरामधीलच मार्ग स्वीकारले. कुणी याला देशीवाद, स्वदेशी, राष्ट्रवाद म्हटलं. कुणी भारतीय अथवा हिंदू संस्कृती म्हटलं. काही नावं दिली, तरी या सर्वांनी भारतीय धर्माची- हिंदू धर्माचीच, समाजाचीच नवी मांडणी, नवे मार्ग, नवे आचारविचार मांडले. आणि हळूहळू या नव्या मार्गाचा खूप मोठा समर्थक वर्गही तयार झाला. या विचारांनाही एक समृद्ध हिंदू- बौद्ध- जैन धर्मपरंपराही आहे. त्यात अनेक गोष्टी समानही आहेत. परंपरा समान आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय लोकशाही रचनेत सर्वांना समान उत्कर्षाची संधीही आहे.
भालचंद्र नेमाडेंच्या देशीवादाचे विचार वाचता वाचता पुरातत्त्व विभागाचे संशोधनही याच सर्व बाबींवर प्रकाश टाकणारे निघावे, हा भारतीय राष्ट्रवादाच्या दृष्टीने शुभ शकूनच म्हणावा लागेल.
 
 
 
भारताची फाळणी धर्म तत्त्वावर इस्लाम आणि हिंदू या प्रकारे झाल्यावर मोहोनजोदारो आणि हडप्पा ही दोन प्राचीन संशोधन शहरे भारतीयांना उपलब्ध राहिली नाहीत. पण स्वातंत्र्योत्तर काळात धोलावीरा, लोथल, काळीबंगा, राखीगढी, भीमबेटका, अजंठा-वेरूळ अशा असंख्य ठिकाणी या देशीवादाचे, राष्ट्रवादाचे, समृद्ध हिंदू संस्कृतीचे दर्शन भारतीयांना झाले. तरीही वसाहतवादाचे अपत्य काँग्रेस आणि माक्र्सवादी-माओवादी आणि पॅन इस्लामवादाचे सेक्युलर समर्थक आजही या गोष्टींना मान्यता देत नाही. उलट माओवादाचे समर्थन करून भारतीय संविधानाला- भारताच्या सार्वभौमत्वाला- भारतीय लोकशाहीलाच सशस्त्र लढे निर्माण करून आव्हान देत आहेत.
 
त्यादृष्टीने या संपूर्ण लेखमालेचा- सदराचा उद्देशच भारतीय समाजरचना, त्यातील विविध जाती-जमाती. त्यातली ज्ञान-विज्ञान-कला कारागिरी, कृषी परंपरा; ज्यांना आज दरिद्री वंचित मागासलेले समजतो; त्यांच्या समृद्ध परंपरा, समृद्ध ज्ञान, भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीतले प्रभावी योगदान, देशावरची झालेली आक्रमणं परतवून लावणा-या लढवय्या जमाती सात-आठशे वर्षे चाललेला प्रदीर्घ स्वातंत्र्य लढा, त्यातले या जाती-जमातींचे योगदान. प्राणपणाला लावून केलेले समाजाचे भारतभूचे रक्षण आणि याचा योग्य उल्लेख आज शिकविल्या जाणा-या स्वातंत्र्योत्तर पाठ्यपुस्तकात नसावा, ही बाब आश्चर्यजनक वाटावी अशीच, आत्यंतिक चीड आणणारीही! समाजवादी चळवळीसुद्धा विद्वेषाच्याच दिशेने वाटचाल करताना दिसतात. त्यामुळे आता निश्चित वेळ आलेली आहे; ती राष्ट्रीयवृत्ती संवर्धनासाठी, संपूर्ण स्वातंत्र्यासाठी सर्वांना समान संधी, समान न्याय, समान सन्मानासाठी, समान राष्ट्रीय शिक्षण, समान अर्थार्जनाच्या संधी. द्वेष पसरविणारे सर्वच विचार गाठोडं बांधून सोडून द्यायला हवेत. समाजधर्म आचरणाचा धर्म, राष्ट्रधर्म, संविधानधर्म हा एकच हवा. कोणत्याही भेदाला खतपाणी घालणारा कायदा असताच कामा नये. व्यक्ती ते समष्टी, परमेष्टी हा उत्कर्षाचा मार्ग वंश, लिंग, भाषा, जन्म, जात या भेदांच्याही पलीकडे घेऊन जाणारा असावा.
 
यासाठी ढोलवीरा, लोथल, कालीबंगा, राखीगढी या संशोधनाकडे पाहायला हवे. राखीगढी, कालीबंगा यातील उत्खननात जे अवशेष संशोधकांच्या हाती लागलेत, त्यातून प्रगत शेती, शेतीचे नांगर, बी-बियाणे, सुती वस्त्र, रेशमी वस्त्र, तांब्याची भांडी, चांदीचा वापर, अनेक प्रकारचे मणी, त्यांच्या माळा, अलंकार, जहाज बांधण्याचं तंत्र डॉक यार्ड. मृत्यूनंतरचा दफनविधी, दाहकर्म, समाधी बांधकाम, भांड्यावरील चित्र नक्षीकाम. रंगीत नक्षी, घरं, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह अशा असंख्य गोष्टी या सर्व ठिकाणी उत्खननात मिळाल्या. इ. स. पूर्व साडेतीन हजार ते इ. स. पूर्व सात ते आठ हजार वर्ष मागे या सुसंस्कृत भारतीय संस्कृतीचा शोध लागलाय. विशेषतः हरयाणातील ‘राखीगढी' येथील उत्खनन हे पुरातन सरस्वती नदीच्या खो-यातील आहे. आजवर अशा प्रकारचे आर्यसंस्कृतीचे अवशेष सापडले नव्हते. सिंधू सभ्यता होती, याची चर्चा आजवर होत असे. सरस्वतीच्या काठच्या या शोधाने गेली दीड-दोनशे वर्ष आर्य-द्रविड या वादाने समाजात उभी-आडवी फूट पडू लागली होती. पाश्चात्त्यांच्या संशोधनाचा हेतूच संशयास्पद होता. आता सारंच चित्रं पालटलंय. आर्यन संस्कृती भारतातच उगम पावली, विस्तारली. साèया विश्वात आर्य गेले. या मांडणीला पुष्टी मिळाली.
 
डेक्कन कॉलेजचे कुलगुरू राहिलेले डॉ. वसंत शिंदे यांनी उभं आयुष्य या सर्व पुरातत्त्वीय संशोधनात ओतलं. आज जागतिक मान्यता मिळालेल्या या संशोधनाने जगाच्या इतिहासाची रचनाच बदलून गेलीय. अनेक चळवळी, अनेक सिद्धांत या संशोधनाने बदलावे लागतील. नाईल नदीवरच्या उत्खननातील किंवा भीमबेटकातील शैलचित्रांचे कालखंड या सगळ्यांचा पुनर्विचार करावा लागेल. या सर्व संशोधनामागची प्रेरणा चाळीसेक वर्षांपूर्वी स्व. मोरोपंतांनी पुढाकार घेऊन केलेला सरस्वती शोधयात्रेचा ‘प्रपंच महाभारत पूर्वकाळ ते महाभारत काळ याचे अनेक पुरावे सरस्वती शोध यात्रेतच गवसले. या सर्व बाबींमुळे वैदिक काळही बराच मागे जाईल. एक मोठं क्षेत्र संशोधनाचं भारतीय उपखंडाच्या गेल्या पन्नास हजार ते एक लाख वर्षातील मानवी जीवनाच्या भारतीय संस्कृतीच्या उत्क्रांतीचं, विकासाचं. खगोल- गणित- भूगोल-इतिहास- रसायनशास्त्र- भारतीय समाजजीवनशास्त्र, व्यष्टी ते समष्टी ते परमेष्टी. पिंडी ते ब्रह्मांडी यावर पुरातत्त्वीय संंशोधनातून प्रकाश पडेल.
 
भारतात आता ‘नासा'सारखी संशोधन करणारी संस्था उभी राहायला हवी. भारताच्या सर्व भाषांतील अभ्यासक्रम बदलायला हवेत. केवढं काम समोर खुणावतंय. गावागावांत पुन्हा उपनिषद, धम्मपद, वेदांचे घोष दुमदुमायला हवेत. आता तरुणाईनं शिक्षण पूर्ण करून भारताच्या खेड्यात नव्या आधुनिक आणि प्राचीन अशा शाळा, गुरुकुलं सुरू करायला हवीत. प्रशिक्षार्थी, नोकरीच्या शोधात निघणा-या तांड्यांऐवजी संशोधकाच्या टोळ्या निघायला हव्यात. वि. श्री. वाकणकराचं काम, सरस्वती शोध यात्रेचा पुढचा टप्पा. आजही युवकांविना संशोधन अपूर्णच आहे. यासाठी भारतीय विचारवंत, संशोधक यांनी समोर येऊन एक व्यासपीठ बनवायला हवं. भारतविद्या संशोधन संस्थानसारखं- ‘नासा' तयार व्हायला हवं. पुनः मोरोपंत, बाबासाहेब आपटे, वाकणकर व ठेंगडी हवेत... या देशीपणाला आकार देणारे...!