मायलेकींनी सर केले कळसुबाई शिखर

    दिनांक :15-Feb-2021
|
 
 
kalsubai_1  H x
 
तभा वृत्तसेवा
कारंजा (घा.),
कारंजा घाडगे येथील प्रिती प्रेम महिले व खुशी महिले या मायलेकींनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर नुकतेच सर केले आहे. नागपूर येथील नाईन बियाँड अॅडव्हेंचर ग्रृपमधील १५ जण या मोहिमेत सहभागी झाले होते.पायथ्यापासून तर शिखरापर्यंत जवळपास सहा तासात शिखर सर करण्याची मोहीम या चमूने फत्ते केली.खुशी महिले ही चिमुकली सध्या आठवित शिकत असून नवनवीन गोष्टी शिकण्याचा तिला ध्यास असून शनशाईन स्कूलचे संस्थापक असलेले वडील प्रेम व आई प्रिती महिले यांचे तिला सतत प्रोत्साहन मिळत असते.चित्रकला,नृत्य व स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची तिला आवड असून अनेक उपक्रमात तिने पारितोषिक पटकावले आहे.तिच्या साहसाबद्दल कारंजा परिसरात तिचे कौतुक होत आहे.