संशयास्पद शिधापत्रिका तपासणी सुरू

    दिनांक :15-Feb-2021
Total Views |
-जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत चालणार मोहीम
-सर्व रंगांच्या शिधापत्रिका तपासणार
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
 स्वस्त धान्य उपलब्ध करून देणाèया अपात्र शिधापत्रिकाधारकांची तपासणी १ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबवण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान सबळ पुरावे प्राप्त न झाल्यास संबंधित शिधापत्रिका रद्द करून धान्यसुद्धा बंद करण्यात येणार आहे. तपासणीची जबाबदारी तलाठ्यांवर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बनावट शिधापत्रिकावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
 

patrikas_1  H x 
 
शहरी तसेच ग्रामीण भागात अनेकांनी बनावट शिधापत्रिका बनवून घेतली आहे. या शिधापत्रिकांच्या माध्यमातून रेशनच्या दुकानातून सर्रासपणे धान्याची उचल केली जात आहे. हा प्रकार थांबवण्याच्या दृष्टीने शासनाने शिधापत्रिका तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेंतर्गत बीपीएल, अंत्योदय, केशरी, पांढरी अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यात रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांनी माहिती भरून दिलेले फॉर्म स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी, पोचपावती देण्यात येणार आहे.
 
फॉर्म भरून देताना शिधापत्रिकाधारकांना वास्तव्य करीत असलेल्या भागाची भाडेपावती, वीजबील, गॅस जोडणी, बँक पासबुक इत्यादी पुरावे द्यावे लागणार आहेत. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून आवश्यक ती जुनी कागदपत्रे जोडून सर्व फॉर्म संबंधित शासकीय कर्मचारी, तलाठी कार्यालयाकडे जमा करावे लागणार आहेत.या तपासणीत आलेल्या कागदपत्रांची इत्यंभूत पाहणी करण्यात येणार आहे. छाननीनंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी गट अ म्हणून आणि पुरावा न देणारयाची यादी गट ‘ब म्हणून करण्यात येईल. ‘ब' गटातील शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करून त्यांचे रेशनकार्ड निलंबित करण्यात येणार आहे. ही मोहीम १ फेब्रुवारीपासून चालू झाली असून ती ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.
 
बनावट रेशनकार्डधारकांसह ते बनवणाचाही शोध घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील हजारो लाभार्थींकडे बनावट रेशनकार्ड आहे. ते बनवताना तहसील कार्यालयातील काही कर्मचारी आणि तेथील दलालांच्या माध्यमातूनच बनवल्याची दाट शक्यता आहे. बनावट कार्डधारकांसह बनवणाèयांचा शोध घेतल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून मोहीमेला सुरवात झाली. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला मोहिमेच्या सूचना दिल्या आहेत. तालुका स्तरावर तलाठी किंवा  प्रशासकीय व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश पुरवठा निरीक्षकाला दिले आहेत. मोहिमेत अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम करणाèयांवरही कारवाई करण्यात येणार आहे, असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली बेहरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण शिधापत्रिका :
अंत्योदय १ लाख ३० हजार १०७
बीपीएल १ लाख ४७ हजार ३६४
केशरी २ लाख २८ हजार ६८
पांढरी २४ हजार ६५
एकूण शिधापत्रिका ६ लाख ७८ हजार १०४