शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

    दिनांक :19-Feb-2021
|
चिखली, 
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवभक्त शिवजयंती उत्सव समिती चिखलीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते. या शिबिरात 207 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच मास्क देण्यात आले. या शिबिराला विविध संस्था, संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भेटी दिल्या.
 

buldhna shiv_1   
 
 
 
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीचा रक्तदान शिबिराचा उपक्रम स्वागतार्ह आहे. या शिबिरात सहभाग घेवून रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांनी खरच समाजाच्या रूणाईतून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी शिवभक्त शिवजयंती समितीच्या सर्व सदस्यांनी व नागरिकांनी सहकार्य केले. रक्त संकलन खामगाव येथील सामान्य रुग्णालयची रक्तपेढी तसेच जीवनधारा ब्लड बँक बुलडाणाच्या संचालकांनी केले.