यवतमाळात दोन मृत्युंसह 126 बाधित

    दिनांक :19-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
24 तासांत जिल्ह्यात दोन मृत्युंसह 126 जण नवे कोरोनाबाधित आलेे आहेत. यात 88 पुरुष आणि 38 महिलांचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विलगीकरण कक्षासह विविध कोविड केंद्रांमध्ये भरती असलेल्या 68 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मृत कोरोनाबाधित यवतमाळचा 87 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आहेत. कोरोनाबधित 126 जणांमध्ये यवतमाळातील 59, पुसदचे 36, दारव्हा 19, पांढरकवडा 6, घाटंजी 3, बाभुळगाव 2 आणि झरीजामणीचे 1 आहे.
 
corona xo _1  H
 
शुक्रवारी एकूण 518 अहवाल आले. यापैकी 126 जण नव्याने कोरोनाबाधित आले तर 392 अहवाल कोरोनामुक्त आले. सध्या जिल्ह्यात 867 कोरोनाबाधित असून आतापर्यंत एकूण रुग्णसं‘या 15,825 झाली आहे. 24 तासांत 68 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या  14,514 आहे. तर जिल्ह्यात एकूण 444 मृत्युंची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 1,50,295 नमुने पाठविले असून यापैकी 1,49,923 अहवाल प्राप्त आहेत. त्यापैकी 1,34,098 नागरिकांचे नमुने आतापर्यंत कोरोनामुक्त आले आहेत.दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसं‘या लक्षात घेता नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मुखाच्छादनाचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.