जिल्ह्यात शुक्रवारी 598 नवे कोरोना रुग्ण

    दिनांक :19-Feb-2021
|
अमरावतीत पुन्हा विक्रम
-तभा वृत्तसेवा
अमरावती,
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबधितांची संख्या पुन्हा उच्चांक पातळीवर पोहचली. एकाच दिवशी तब्बल 598 रुग्णांची नोंद झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 931 कोरोनाग्रस्त झाले आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण समोर यायला सुरुवात झाली होती. गतवर्षी जेव्हा कोरोनाचा प्रसार राज्यातल्या अन्य जिल्ह्यात वेगाने सुरू होता, तेव्हाही बाधितांची संख्या पाचशेच्या खालीच होती. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात रुग्ण संख्या तर कमीच होती. त्या वर्षभराच्या काळात फक्त एकदाच 462 बधितांची नोंद झाली होती. कोरोनाच्या दुसरी लाट येताच जिल्ह्यात सर्वाधिक प्रादुर्भाव जाणवायला लागला.
 
 

cv_1  H x W: 0  
 
28 जानेवारी पासून जिल्ह्यात सलग रुग्ण वाढत आहे. 3 फेब्रुवारीला 179, 4 फेब्रवारीला 159, 5 फेब्रुवारील 233, 6 फेब्रवारील 199, 7 फेब्रुवारीला 192, 8 फेब्रुवारीला 235, 9 फेब्रुवारीला183, 10 फेब्रुवारीला 359, 11 फेब्रुवारीला 315, 12 फेब्रुवारीला 369, 13 फेब्रुवारीला 376, 14 फेब्रुवारीला 399, 15 फेब्रुवारीला 449, 16 फेब्रुवारीला 485, 17 फेब्रुवारीला 498 आणि 18 फेब्रुवारीला 597, 29 फेब्रुवारीला पुन्हा 598 व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहे. गेल्या 22 दिवसात 6 हजार 405 व्यक्ती कोरोनामुळे बाधित झाल्या आहे.