8 मंगल कार्यालयांना 16 लाखांच्यावर दंड

    दिनांक :19-Feb-2021
|
-रस्त्यावरील कारवाईत 1.90 लाख वसुल
-महापालिकेची दंडात्मक कारवाई
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
गत 1 फेब्रुवारीपासून आता पर्यंत महापालिकेकडून 18 मंगल कार्यालयांना 16 लाखांच्या वर दंड आकारण्यात आला असून रस्त्यावरील कारवाईतही 1.90 लाखांचा दंड करण्यात आला आहे. नियमांचे पालन होत नसल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला दिले.
 

bmca_1  H x W:  
 
  
कोव्हीड - 19चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने स्वच्छता विभागाने 1 फेब्रुवारी 2021 ते 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत 1 लाख 90 हजार 600 रुपये इतका दंड वसूल केला आहे. मास्क न बांधणे, अंतर न पाळणे यासाठी दंड करण्यात आला आहे. बाजार व परवाना विभाग व पशुशल्य चिकीत्सक विभाग यांच्या मार्फत लॉन, मंगल कार्यालय यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातील 18 मंगल कार्यालयावर दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
 
 खंडेलवाल लॉन 20 हजार, बेबी पर्ल मंगल कार्यालय 10 हजार, तेलाई मंगल कार्यालय 70 हजार, राजवाडा मंगल कार्यालय 10 हजार, बालाजी मंगल कार्यालय 10 हजार, शहनाई मंगल कार्यालय 30 हजार, प्रभादेवी मंगल कार्यालय 15 हजार, कमल प्लाझा 20 हजार, सिध्दार्थ मंगलम 30 हजार, कांचन रिसॉर्ट यांच्याकडून 50 हजार दंड वसुल करण्यात आला आहे. तर लाली लॉन 2 लाख 50 हजार, व्हाईट हाऊस लॉन 2 लाख 50 हजार, नेमाणी ईन 80 हजार, कल्पदीप मंगल कार्यालय 1 लाख, ताज पॅलेस 2 लाख 50 हजार, रॉयल पॅलेस 2 लाख 50 हजार, आलीशान पॅलेस 2 लाख 50 हजार, पाकीजा हॉल 2 लाख 50 हजार, अशा दंडात्मक नोटीस देण्यात आल्या आहे.