वाशीम,
गेल्या महिनाभरापासून 10 ते 15 च्या आकड्यात असलेली कोरोनाने गेल्या चार दिवसापासून अचानक उसळी घेतली असून, तीन दिवस 40 ते 45 च्या जवळपास असलेली संख्या 19 फेब्रुवारी च्या अहवालात 98 झाली आहे. त्याच दरम्यान 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. एकीकडे कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना जनता देखील सैरभर झाल्याचे दिसत असून, प्रशासन देखील गंभीर नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्याबाहेरील 8 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 7555 झाली असून, त्यात 302 रुग्ण क्रीयाशील आहेत. 7096 जणांना सुटी देण्यात आली तर 156 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
प्राप्त अहवालानुसार वाशीम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील 2, ईश्वरी कॉलनी येथील 1, नवीन आययुडीपी येथील 1, सुंदरवाटिका येथील 5, महालक्ष्मी नगर येथील 1, आययुडीपी येथील 1, काळे फाईल येथील 1, आदिवासी वसतिगृह परिसरातील 1, काटा येथील 1, सावरगाव येथील 1, टो येथील 1, पार्डी येथील 1, झाकलवाडी येथील 1, तामसी येथील 1, निंबळवाडी येथील 1, झोडगा येथील 1, एकांबा येथील 1, रिसोड शहरातील 13, रिठद येथील 1, मोप येथील 1, मांडवा येथील 1, कोयाळी येथील 2, मालेगाव शहरातील 2, मंगरुळनाथ शहरातील राजस्थान चौक येथील 1, मंगलधाम येथील 1, भाऊ नगर येथील 1, व्ही एन कॉलेज परिसरातील 1, शहरातील इतर ठिकाणचे 3, वनोजा येथील 1, चांभई येथील 1, शहापूर येथील 8, नवीन सोनखास येथील 1, अनसिंग येथील 1, कारंजा शहरातील गुरू मंदिर परिसरातील 3, गोकुळ कॉलनी येथील 1, लोकमान्य नगर येथील 1, मोठे राम मंदिर परिसरसतील 1, मस्जिदपुरा येथील 1, वसंतनगर येथील 1, सुंदरवाटिका येथील 1, बायपास परिसरातील 3, तुषार कॉलनी येथील 2, यशवंत कॉलनी परिसरातील 1, बजरंगपेठ येथील 1, यशवंतनगर येथील 1, उंबर्डा बाजार येथील 1, किन्ही रोकडे येथील 1, हिवरा येथील 1, सोहळ येथील 1, पोहा येथील 1, भोयता येथील 2, धानोरा ताथोड येथील 2, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील 2, अंजनी येथील 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.