मुखाच्छादन न वापरणार्‍या नप मुख्याधिकार्‍यावर कारवाई

    दिनांक :19-Feb-2021
|
मंगरुळनाथ,
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर असून, मुखाच्छादन न वापरणार्‍या नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांचेवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन करुन काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मुखाच्छादन वापरणे बंधनकारक असून, मुखाच्छादन न वापरणार्‍या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
 
 
mukh_1  H x W:
 
दोन दिवसात मुखाच्छादन न वापरणार्‍या 56 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पालिका मुख्याधिकारी यांचेवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली असून, गर्दी टाळून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोना नियमाचे सर्वांनी पालन करावे, पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी फिरु नये यासह कोरोना नियम जारी करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र कोरोना नियमाचे पालन कर्तव्य पार पाडले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.