अमित ठाकरे यांनी पादत्राने काढून स्वीकारली छत्रपतींची प्रतिमा!

    दिनांक :19-Feb-2021
|
-जाम चौरस्ता येथे मनसेतर्फे जंगी स्वागत
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट ,
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विदर्भात खाजगी दौर्‍यावर आले असता जाम चौरस्ता येथे त्यांचे मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात जंगी स्वागत करण्यात आले.
 

aaa2_1  H x W:  
 
 
अतुल वांदिले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली असता पादत्राणे काढून ती स्वीकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये आदराची भावना निर्माण झाली. यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, राहुल बालमवर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.