'युजीसी'कडून अमरावतीच्या 'व्हीएमव्ही'ला स्वायत्तता

    दिनांक :19-Feb-2021
|
 ugc_1  H x W: 0
 
- राज्य शासनाची पहिलीच संस्था
तभा वृत्तसेवा
अमरावती,  
येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाने दहा वर्षांसाठी स्वायत्तता बहाल केली आहे. संस्थेचे संचालक डॉ. वसंत बाबुराव हेलावी रेड्डी यांनी ही माहिती दिली. संस्थेने ३० नोव्हेंबर २०१९ रोजी 'संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे स्वायत्तता दर्जा प्राप्त करण्यासाठी अर्ज सादर केला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये संस्था तपासणीसाठी समिती नेमण्यात आली होती. समिती एप्रिल २०२० मध्ये भेट देणार होती. तथापि, कोव्हिड १९ साथीमुळे प्रत्यक्ष तपासणी दि. १५ व १६ जानेवारी २०२१ रोजी झाली. तपासणीनंतर 'युजीसी'ने 'व्हीएमव्ही'ला दहा वर्षांसाठी स्वायत्तता दर्जा' बहाल केला आहे.अशाप्रकारे स्वायत्तता दर्जा प्राप्त करणारे राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाची ही पहिलीच संस्था असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.