छत्रपती शिवाजी महाराज पुण्यवंत, नितिवंत, जाणता राजा- आ. सुधीर मुनगंटीवार

    दिनांक :19-Feb-2021
|
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
पुण्यवंत, नितिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आपले मानबिंदु आहेत. महाराजांचे शौर्य, त्यांचा प्रताप, त्यांचा बाणा, त्यांची शिकवण अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 

asuma_1  H x W: 
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरातील पटेल हायस्कूल समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी बाणा या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपतींच्या प्रतीमेला माल्यार्पण करत आदरांजली अर्पण केली. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, मनपा स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, अरुण तिखे, मराठी बाणा संस्थेचे राम हरणे, पिंटू धिरडे, हर्षद कानमपल्लीवार, अभिलाष कुंभारे, ऋषिकेश महाडोळे, अनिकेत नक्षिणे, रिंकू कुमरे, प्रथम तपासे, भुषण पोरते आदींची उपस्थिती होती.