नगर पंचायत प्रारुप मतदार यादीवर नागरिकांचा आक्षेप

    दिनांक :19-Feb-2021
|
- निवासी वॉर्डामध्ये मताधिकार मिळण्यासाठी देण्यात आले निवेदन
मानोरा,
शहरातील नगरपंचायतीच्या प्रारुप मतदार यादीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार आणि मुख्याधिकारी मानोरा यांना काही जागरूक नागरिकांनी आक्षेप घेऊन दुरुस्तीसाठी निवेदन दिले आहे. मानोरा नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली असून, ज्या वॉर्डामध्ये नागरिक कायम रहिवासी आहेत त्या नागरिकांना राहत असलेल्या वार्डातच मताधिकार मिळण्याची अपेक्षा निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे.
 
 
voter_1  H x W:
 
मानोरा शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये स्थानिक रहिवाशी मतदार असून, त्यांची नावे इतर प्रभागामधे समाविष्ट कसे व का करण्यात आले यावर आक्षेप घेत स्पॉट व्हेरिफिकेशन व लोकेशन पाहून संबंधित नागरिकांची नावे सात क्रमांकाच्या वॉर्डामध्ये समाविष्ट करण्यात येण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जे मतदार वार्ड क्रं. सात मध्ये वास्तव्याला नाही त्यांची नावे कमी करून प्रारूप यादी मध्ये दुरुस्ती करण्याची मागणीही या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे. नगरपंचायत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी वसंत चव्हाण, मनोहर चव्हाण, पियुष अरुण राठोड, स्वरूपा अनिल चव्हाण, रुपाली राऊत व इतरही नागरिक उपस्थित होते.a