दिग्रस न.प उपाध्यक्षासह 15 जणांवर गुन्हे दाखल

    दिनांक :19-Feb-2021
|
- डीजे वाजविणे व रॅली काढणे भोवले
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
दिग्रस नगर परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना गटनेते अजिंक्य मात्रे यांच्यासह 15 जणांवर कोरोना संक्रमण  काळात डीजे वाजवीत दुचाकी वाहन रॅली काढल्याने ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची अवज्ञा झाल्याने गुन्हे दाखल केले आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गुरुवार, 18 पासून जिल्हाधिकार्‍यांनी यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश पारित केले आहेत. सर्व सण, उत्सव, लग्न समारंभ, अंत्ययात्रेत सहभाग घेण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत.
 
dj _1  H x W: 0 
 
त्यापूर्वी शांतता समितीच्या बैठकीतसुद्धा सण उत्सव हे कमी लोकात व कमी वेळात साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिले असतासुद्धा स्टंट करून अजिंक्य मात्रे, नगरसेवक केतन रत्नपारखी, प्रज्योत अरगडे, साहिल जयस्वाल, आकाश देशमुख, प्रतीक देशमुख, राहुल गाडे, प्रशांत गौरकार यांच्यासह काही जणांवर रॅली काढण्यावरून आणि डीजे वाहनचालक समाधान कटेकर व वाहनमालक नीलेश रगडे यांच्याविरुद्ध ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी गुन्हे दाखल केले आहेत.