बोरी मापारी येथे एका इसमाकडून चौघांवर प्राणघातक हल्ला

    दिनांक :19-Feb-2021
|
वाशीम,
तालुक्यातील अनसिंग पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम बोरी मापारी येथे 18 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी एका इसमाने चार जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली.बोरी मापारी येथील बालाजी उत्तम मापारी (वय 35) या इसमाने पहाटे 6 वाजता च्या सुमारास गावातील संतोष दिगंबर मापारी, बालाजी दौलत मापारी, पांडुरंग रामचंद्र मापारी, कांचन बालाजी मापारी यांना काहीही कारण नसतांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्याने फेकून मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
 

jaja_1  H x W:  
 
याबाबतची तक्रार फिर्यादी संतोष दिगंबर मापारी यांनी अनसिंग पोस्टे मध्ये दिली. त्या तक्रारीवरुन अनसिंग पोलिसांनी आरोपी बालाजी उत्तम मापारी यास ताब्यात घेतले असून, त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील गंभीर जखमी पांडुरंग रामचंद्र मापारी यास अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तर फिर्यादी संतोष दिगंबर मापारी यांचेवर वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास ठाणेदार एल. एल. तसरे, नंदकिशोर कुर्‍हाडे करत आहेत.