यवतमाळ आठवडी बाजारातील अतिक्रमणावर गजराज

    दिनांक :19-Feb-2021
|
-तिसर्‍या दिवशीही धडक कारवाई
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,  
गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी अतिक‘मण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून चार दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. त्यात गुरुवार, 18 फेब्रुवारी रोजी शहरातील आठवडी बाजार, पाच कंदील चौक, शनी मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. 
नगर परिषदेने 18 फेब्रुवारी रोजी शहरातील या भागात अतिक्रमण कारवाई करून त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण  जमिनदोस्त केले. आठवडीबाजार परिसरात एक झोपडपट्टी बसविण्यात आली होती. त्या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने जेसीबीच्या सहायाने परिसरातील अतिकमन हटविले.
 
 bajar _1  H x W
 
पाचकंदील चौक व शनीमंदिर परिसरात लावण्यात आलेली दुकाने, चहाटपरी तसेच दुकानाच्या बाहेर टिनाचे करण्यात आलेल्या अवैध बांधकामावर जेसीबी चालवला. या कारवाईत संपूर्ण परिसरात असलेले अतिक्रमण काढून ते भुईसपाट करण्यात आले. ही कारवाई करताना पोलिस प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. यावेळी नगर परिषदेचे गजानन गुल्हाने, अशोक मिसाळ, अतिक्रमण पथकप्रमुख राहुल पळसकर, राजेश चव्हाण, अमोल डोईजड, धनराज अरके, अमोल पाटील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.