कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरसावल्या जिजाऊंच्या लेकी

    दिनांक :19-Feb-2021
|
-प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
देऊळगाव राजा,
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून यामध्ये आरोग्य विभाग पालिका प्रशासन विभाग तसेच पोलीस विभाग तहसील विभाग यांच्या पुढाकारातून देऊळगाव राज्यातील चार जिजाऊच्या लेकींनी कंबर कसली असून स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
 
 

buldhNA28_1  H  
 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने पाउल उचलत सर्वसामान्य नागरिकांसाठी काही सुचना तसेच निर्बंध लावलेले आहेत. या सूचनांचे पालन करत देऊळगाव राजा तहसीलदार सारीका भगत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे नगराध्यक्षा सुनिता रामदास शिंदे वैद्यकीय अधीक्षक आसमा शाहीन यांनी प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. गत दोन दिवसांपासून शहरांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये विना मास फिरणार्‍यावर कारवाई केल्या जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व या केंद्रावर उपस्थित असलेले कर्मचारी डॉक्टर यांना आवश्यक त्या सूचना देऊन आता वाढत्या संसर्गावर उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना तथा मार्गदर्शन केलेले आहे. याच बरोबर देऊळगाव राजा तहसीलदार सारिका भगत यांनी तालुक्यातील सर्व विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन जिल्हाधिकारी यांच्या नियमाचे पालन करून आवश्यक उपाय योजना संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.
 
तर मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी संबंधित आरोग्य विभागाला शहरांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी तसेच नागरिकांनी मास्क वापरून योग्य ती काळजी घ्यावी यासाठी पालिका कर्मचार्‍यांना आदेश दिलेले आहेत. त्यानुसार दोन दिवसांमध्ये शंभराहून अधिक मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे तसेच ठाणेदार संभाजी पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना चौकाचौकांमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
 
तरी या बाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.आसमा शहीन यांनी कोरोना लसबाबत कुठल्या प्रकारची भीती न बाळगता लस घ्यावी. लस नागरिकांना लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना लक्षण असल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.देऊळगाव राजा येथील प्रती तिरुपती बालाजी असलेले बालाजी महाराजांच्या मंदिरावर भाविक भक्तांनी गर्दी करू नये असे आवाहन स्थानिक नगरसेविका पल्लवी वाजपे यांनी केले असून बालाजी संस्थान तसेच धार्मिक विधी व पूजा आरती करतांना गर्दी करू नये असे आवाहन पल्लवी वाजपे यांनी केले आहे