गोठ्यावर वीज पडून 20 क्विंटल कापूस जळाला

    दिनांक :19-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
तालुक्यात सर्वत्र वादळीवार्‍यासह पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले.दरम्यान, शेगांव (कुंड) येथे वीज पडल्याने एका शेतकर्‍याचा सुमारे 20 क्विंटल कापूस जळाला.मिळालेल्या माहितीनुसार, शेगांव (कुंड) येथील शेतकरी प्रकाश वाघिडे यांची मौजा कुंड येथे शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात जवळपास 30 क्विंटल कापूस ठेवला होता.
 

kapus122_1  H x 
 
जोरदार वादळी पावसादरम्यान गोठ्यावर वीज पडल्याने जवळपास 20 क्विंटल कापूस जळाला. यात त्यांचे 1 लाख 20 हजार रुपयाचे नुकसान झाले. शेतकर्‍याने तलाठ्याकडे तक्रार केली असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.