हिवरा (संगम) येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात

    दिनांक :19-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
हिवरासंगम,
करोनाबाधित रुग्णांची सध्या  कमी झाली असली तरी धोका कायम असल्याने राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन शिवप्रेमींना केले होते. त्याच अनुषंगाने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांची 391 वी जयंती मोठ्या उत्साहात साध्या पद्धतीने नियम पाळून साजरी करण्यात आली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता साहेबराव कदम यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 
hiwara_1  H x W
 
यावेळी माजी जिप सदस्य साहेबराव पाटील, जिप सदस्य विलास भुसारे, मुख्यध्यापक मुकुंद पांडे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य जयश्री राजेंद्र कदम, अनिता जामकर, अलकावती कदम, मीनाक्षी शिंदे, जयश्री विजय कदम, शरद कदम, अशोक पाटील, नितीन कदम, माजी सरपंच प्रवीण जामकर, माजी उपसरपंच डॉ. धोंडिराव बोरूळकर, सुधीर कदम, सोसायटीचे अध्यक्ष विनायक कदम, विस्तार अधिकारी किशोर कुरकुटे, पंजाब कदम, सुनील बोंपिलवार, माधव बोरूळकर, सुभाष मोरे, शिरीष बोरूळकर, शंकर पवार, देविदास कदम, सतीश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कांबळे, उपाध्यक्ष अनिल बोंपिलवार, कोषाध्यक्ष विशाल, सचिव आजम सौदागर, छत्रपती शिवराय तैलचित्र समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम, सुनील चव्हाण, मुकुंद जामकर, शेख फिरोज, निलेश करमोडकर, किसन गिरी, विवेक करमोडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक‘माचे संचालन महेश कामारकर यांनी केले, तर आभार सुनील चव्हाण यांनी मानले.
चाळीस दिवस अखंडदीप
हिवरा येथील शक्ती संतोष कदम व अनिल बोरकर हे युवक स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त शिवभक्त 1 फेब्रुवारी ते 11 मार्च या चाळीस दिवसांच्या कालावधीत ‘बलिदान मास’ पाळून येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर चाळीस दिवस अखंडदीप तेवत ठेवण्याचा उपक‘म राबवीत असतात. याबद्दल छत्रपती तैलचित्र समितीच्या वतीने त्यांचा सुधीर कदम, विनोद खोंडे, प्रभाकर वानखेडे, राम जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. ती परंपरा कायम ठेवत हिवरासंगम गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. छत्रपती शिवराय चौक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजमाता जिजाऊ चौक, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर चौक तसेच माध्यमिक शाळेची साफसफाई करण्यात आली.