दुस-या टप्प्याची मंजुरी, कार्यकृतीचे फळ

    दिनांक :19-Feb-2021
|
-डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचे प्रतिपादन
-महामेट्रोचा सहावा वर्धापनदिन
नागपूर,
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्यपद्धतीमुळेच नागपूर मेट्रो रेल्वेच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्याच्या कामाचे फलित म्हणूनच दुसर्‍या टप्प्यासाठी परवानगी देण्यात आली आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रोच्या 6 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. डॉ. दीक्षित यांनी आनंद व्यक्त केला की, या सहा वर्षात आम्ही अनेक मैलाचे दगड पार केले आणि अनेक यशाचे मानकरी ठरलो आम्हाला मिळालेले अनेक काम हा एकप्रकारे आमचा केला गेलेला गौरवच आहे. यामध्ये नवी मुंबईचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या जबाबदारी व्यतिरिक्त नाशिक मेट्रोच्या कामाचाही समावेश आहे. ते म्हणाले की, आपण ज्या चिकाटीने, संयमाने आणि कर्तव्यातत्पर राहून काम केले आहे त्यापेक्षा अधिक क्षमतेने काम करण्याची गरज आहे. आपल्यासमोर असलेले आव्हाने प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात साध्य होतील यात शंका नाही आणि महा मेट्रोच्या कामकाजाशी नागरिकांना जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना जागतिक स्तराच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, मेट्रो रेल्वेचे बांधकाम आणि कार्यपद्धती सोबतच आता आपण सेवा पुरवण्याची मानसिकता स्वीकारली पाहिजे, दर्जेदार काम करत राहिल्यास आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे आश्वासन डॉ. दीक्षित यांनी मेट्रो कुटुंबाला दिले. 

metro _1  H x W
 
ते म्हणाले की, तिसर्‍या टप्प्याच्या कार्याबद्दलही चर्चा होऊ लागली आहे आणि हेच आपल्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे. मंजुरीने पहिल्या टप्प्यातील कामात नवे चैतन्य निर्माण केले असून आगामी नववर्षाच्या पहिल्या तिमाहीत दुसर्‍या टप्प्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्याचा विश्वास त्यांनी दिला. ते म्हणाले की, सुरक्षित आणि विश्वसनीय वाहतूक सुविधा, अपघातमुक्त हालचाली आणि पर्यावरणाचे रक्षण करून देशसेवेच्या क्षेत्रात आम्ही नक्कीच सर्वोत्तम कामगिरी करू..
 
 
वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मेट्रो मित्र मेळावा, नागपूरकर जीवनशैली हे विषय होते. या वर्षी, प्रकल्प उभारणी आणि संचालन मध्ये सहकार्य करणार्‍या चर्चेसाठी विविध क्षेत्रांमध्ये नामवंतांना आमंत्रित करून परिसंवाद आयोजित करण्यात आले. महिला सुरक्षा, महा कार्ड, फिडर सर्व्हिस या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सचिन ढोमणे, आनंद निर्वाण, जुगल किशोर बोरकर, निखिल वानखेडे आणि सुधीर डबीर शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.