चाकूच्या धाकावर लुटणार्‍या दोघांना अटक

    दिनांक :19-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
एका बँकेचे दैनिक कलेक्शन करणार्‍या 17 वर्षीय युवकास चाकुच्या धाकावर लुटल्याची घटना शहरातील संत तुकडोजी वार्ड परिसरात घडली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तालुक्यातील सुलतानपूर येथील दोन गुन्हेगारास अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार गौरव येणुरकर (17) रा. तुकडोजी वार्ड हा 17 रोजी रात्री 8 वाजता दरम्यान डेली कलेक्शनचे पैसे करीत मोपेडवर बसुन असता आरोपीनी क्रमांक नसलेल्या स्कूटरवर येत चाकूचा धाक दाखवत मारहाण करून रोख 3 हजार रुपये जबरीने हिसकावुन नेले. गौरव येणुरकर यांच्या तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
 

gauro_1  H x W: 
 
 
 गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस हवालदार विवेक बनसोड यांनी पथकासह आरोपी सुदन उर्फ लाल्या भगत (24) तसेच रोशन गजानन भगत (22) दोन्ही रा. सुलतानपुर (हिंगणघाट) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक मोपेड, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना 20 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात तसेच ठाणेदार संपत चौहान यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवेक बनसोड, सुहास चांदोरे, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले यांनी केली.