धारणीत दुसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस

    दिनांक :19-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
धारणी, 
गुरुवारी दुपारी गारपीट, रात्री पाऊस आणि शुक्रवारी दुपारी पुन्हा जोरदार पाऊस मेळघाटात झाल्याने आता शेतातील उभ्या पिकांना प्रचंड धोका झालेला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी खरीपानंतर रब्बी पिकाला सुद्धा मुकणार, अशी स्थिती येऊन ठेपलेली आहे.
dharni11_1  H x 
 
कोरोनामुळे शुक्रवारचा धारणीचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. मात्र चार नंतर पाच वाजेपर्यंत धारणी व लगतच्या चिखलदरा तालुक्यात जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतातील हरभरा, गहू, तूर आणि आदिवासीच्या परसबागेतील हिरवा भाजीपाला पण खराब झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सोयाबीन गमावलेल्या आदिवासी शेतकर्‍यांवर रब्बी पीक गमवावे लागणार, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. मेघाच्या गडगडासह पाऊस बरसला.