कोरोना बाधीत वाढले : काळजी घेण्याचे आवाहन

    दिनांक :19-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
पुलगाव
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे, प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करणे यावर चर्चा करण्यासाठी नगर पालिकेत व्यापारी, नागरिक, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाची संयुक्त बैठक नगर पालिकेत सांयकाळी पार पडली.नप अध्यक्ष शीतल गाते व पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या बैठकीत मुख्याधिकारी विजय देवळीकर, ठाणेदार रविंद्र गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ नारळवार व डॉ. श्रीधर ताम्हणकर आदी अधिकारी उपस्थित होते.
 

corona xo _1  H 
 
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने त्याबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, सामाजिक दुरावा, मुखच्छादनाची सक्ती, आदी बाबत जन जागृती करणे. पालन न करणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे, आदींवर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी आता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. आता बाजारपेठेत ही गर्दी वाढली असून व्यापार्‍यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.
 
मंगल कार्यालय चालकांवर टाकण्यात यावी तसेच विवाह समारंभाचे व्हिडीओ शूटिंग करून त्याची तबकडी पोलिसांनी मागवावी या सूचनेला पोलिसांनी दुजोरा दिला.या बैठकीस भाजप ओबीसी मोर्चाचे संजय गाते, भाजप गट नेते राजीव जायस्वाल, सुरेश सुखीजा, भाजप व्यापारी आघाडीचे आकाश बतरा, नगरसेवक गौरव दांडेकर, पवन पोहरे नगरसेवक, व्यापारी, नागरीक नगर पालिकेचे स्वच्छता अभियंता रुपेश नवलाखे, स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे, सुनील परिहार,अं कुश मांजरे, आश्विन फुलझेले उपस्थित होते.