तभा वृत्तसेवा
सिंदी( रे.) ,
शासनाच्या अनेक चांगल्या योजनांचा फज्जा कसा उडवायचा हे सेलूच्या नायब तहसीलदार नितीन गौर कडून शिकण्याची वेळ या सर्कलच्या शेतकर्यांवर आली आहे. चणा विकण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणार्यांना हे अधिकारी लेखी अर्ज करा सांगून त्रस्त करीत आहेत.
सध्या चणा विक्रीसाठी नावं नोदविणे सुरू आहे. संबंधित एजन्सीकडे अद्ययावत 7/12, पेरेपत्रक तलाठ्याच्या स्वाक्षरी शिक्क्यासह सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, अनेक तलाठी मुख्यालयी राहत नाही. हेलोडीच्या पटवारी चार दिवसानंतर गुरुवारी कामावर आल्यात. पण ,लिंक फेल झाली. त्यामुळे शेतकर्यांना 7/12 मिळाला नाही.
शुक्रवार ते रविवारी सुट्टी आणि शनिवारी पुन्हा लिंक मिळत नाही, असे तलाठी म्हणतात. हा घोळ संपावा म्हणून नायब तहसीलदार नितीन गौर यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की माझ्या कार्यालयात लेखी अर्ज करा बघतो काय करायचे ते! पण, प्रसंगावधान बघून तातडीने शेतकर्यांना सेवा देण्यासाठी ते मदत करण्यास तयार नाही. काही तलाठ्यांना कोरोणा नियंत्रण कामी लावले. त्यात हेलोडीच्या तलाठ्याचा समावेश आहे की नाही हे सुद्धा गौर सांगू शकले नाही.