प्रकल्प अधिकार्‍यांच्या दत्तक गावातच बालमृत्यू

    दिनांक :20-Feb-2021
|
वेळेत मातेवर उपचार नाही
दोषींवर कारवाईची मागणी
 
तभा वृत्तसेवा
धारणी, मेळघाटातील रायपूर आरोग्य उपकेंद्रातून मदत मिळाली नसल्याने लक्ष्मी ठाकरे नाावच्या मातेला आपले दोन नवजात अपत्यांना गमवावे लागल्याची घटना उशीरा उजेडात आली. प्रहारचे तोटे यांच्या माध्यमाने सरपंचा निशा यांनी डॉक्टरसह संबंधित चार कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
 

semadoha_1  H x 
 
धारणपासून ७८ किमी अंतरावरील रायपूर ता. चिखलदरा येथील माता लक्ष्मी शिवकुमार ठाकरेला पूर्ण दिवस गेल्यावर प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यांना नर्स, डॉक्टर, आशा यांची मदत अप्राप्त झाली तर रुग्णवाहिका पण मिळाली नाही. परिणामी घरातच प्रसुती करावी लागली. मात्र, प्रसुतीनंतर पुन्हा प्रसुती वेदना सुरु झाल्यावर गावातील एका कालिपीली भंगार वाहनात लक्ष्मी तथा नवजात बालकासोबत मातेला सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आणण्यात आले. रायपूर येथे जन्मलेला बाळ येथेच मरण पावला तर दुसर्‍या प्रसुतीसाठी अमरावती नेतांना दुसरे अपत्य पण मरण पावल्याची हृदयविदारक घटना घडली. लक्ष्मीचे दोन्ही बाळ मरण पावल्याने तिची अवस्था पण बिघडलेली होती. रायपूरच्या सरपंचा निशा यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
 
रायपूर गाव हे धारणीचे प्रकल्प अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दत्तक घेतलेले गाव आहे. अशा ठिकाणी जर गरोदर मातेवर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असेल तर इतर गावांचे हाल बेहाल समजणे काही गैर होणार नाही. रायपूर येथील उपकेंद्र नेहमी बंद राहते. येथील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी रुग्णवाहिकेसह फरार असतात. यामुळे दोन निरागस बालकांचा जीव गेल्याचा सरळ आरोप लावण्यात येत आहे. यापूर्वी धारणी तालुक्यातील खापरखेडा गावात एक माता मृत्यू झालेला होता. यासाठी एकाही कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई झालेली नाही. अब्दुल कलाम आहार समितीचे सदस्य रमेश तोटे यांनी रायपूर प्रकरणात गैरहजर दोषींविरुध्द निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. दिवसभर रुग्णवाहिका मेळघाटात व धारणी चिखलदरा शहरात धावतांना दिसतात मात्र प्रसुतीसाठी मिळत नाही ही एक शोकांतिका आहे.