आविका संस्थेचे कमिशन व मंडी चार्जही प्रलबिंत

    दिनांक :20-Feb-2021
|
- शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्वरीत द्या
- भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी
कुरखेडा,
आदिवासी विकास महामंडळच्या निर्देशानुसार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या वतिने सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर शेतकरी बांधवांनी धान्य विक्री केली आहे पंरतु मागील एक महिण्यापासुन शेतक-यांच्या चुकारे मिळाले नाही त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहे.त्यामुळे शासन प्रशासनाने त्वरीत शेतकरी बांधवाचे चुकारे घ्यावे . अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा आविका कुरखेडाचे उपसभापती चांगदेव फाये यांनी केली आहे.
 
gadchiroli _1  
 
शासन प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शेतक-यांना धान्य विक्री करतांना आर्थिक मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत असतो. धान्य विक्री केल्यानंतर चुकारे वेळेत मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटाना तोंड द्यावे द्यावे लागते. मागील वर्षी शेतकरी बांधवानी स्वःताचा बारदाना दिला असुन शेतकऱ्यांना बारदाना किंवा बारदाण्याची रक्कम अघापही देण्यात आली नाही. त्त्यामुळे बारदान्याचे पैसे त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले आहे. कुरखेडा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी खरिप हंगामातील रब्बी हंगामातील धान आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे विकले असुन शेतकरी बांधवानी धान विक्री करतांना स्वःताचा बारदाना दिला असुन एक वर्ष चा कालावधी लोटूनही शेतक-यांच्या खात्यात बारदानाचे पैसे जमा करण्यात न आल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत आहे.
 
 
या वर्षीच्या चालू हंगामात सुध्दा शेतकऱ्यांच्या धान्य विक्री केले त्यातही चुकारे मिळण्यात दिरगांई होत आहे. करिता संबंधित विभागाने शेतकऱ्यांचा खात्यात धान विक्रीचे चुकारे व धान्य बारदानाची रक्कम त्वरीत देण्याकरिता लक्ष घ्यावे . तसेच आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे मागील वर्षाचे कमिशन व मंडी चार्ज तसेच चालु वर्षाचे कमीशन मंडी चार्ज अदा करावे व धान खरेदी केंदावरील धानाची उचल त्वरीत करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा आविका उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केली आहे.