संचारबंदीने भाजीपाल्याचे भाव मातीमोल

    दिनांक :20-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
आष्टी (श.),
गेल्या दोन दिवसात ढगाळ वातावरण त्यानंतर आलेला वादळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातून सावरण्यापूर्वी पुन्हा आज शनिवार 20 पासून 36 तास जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार असल्याचे जाहीर होताच सकाळीच भाज्या मातीमोल ठरल्या.
 
 
bhaji_1  H x W:
 
तळेगाव शामजी पंत येथे शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असतो. तळेगाव येथील बाजारात परिसरातील 10 ते 15 गावांतील नागरिक भाजी खरेदी आणि विक्रीसाठी येतात. परंतु, 36 तासांच्या संचारबंदीच्या आदेशाने बाजारात दलाल व व्यापारी न आल्यामुळे भाजी उत्पादक शेतकर्‍यांना भाजीपाला बेभाव विकावा लागला. त्यामध्ये टमाटर 20 ते 50 रुपये कॅरेट, सांभार 3 ते 5 रुपये किलो, 2 ते 5 रुपये किलो पालक तर 20 किलो वांगे 20 ते 40 रुपये विकावे लागले. यात शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे बाजारात जाण्यायेण्याचे पैसेही निघाले नाहीत.