हे आंदोलन कित्तेक दिवस चालेल?

    दिनांक :20-Feb-2021
|
- वर्ध्यातील आंदोलनात दिल्लीचे नेते
तभा वृत्तसेवा
वर्धा,
शेतकऱ्यांच्या शांतीमय आंदोलनाला सुरूवातीला केवळ पंजाब आणि हरियाणा येथीलच असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. पण भाजपचे नेते सांगताहेत तसे काहीच नसून सध्या हे आंदोलन संपूर्ण विश्वाचे झाले आहे. महात्मा गांधी यांचा आवाज बंद करणारेच सध्या शांतीमय पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ही लढाई आणखी जास्तकाळ चालेल त्याची तयारीही प्रत्येक शेतकऱ्याने करावी, असे प्रतिपादन गुरू अमानीत सिंग मांगत यांनी केले.
 

delhi_1  H x W: 
 
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात वर्धा शहरातील बजाज चौक परिसरात आज २० रोजी विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्यावतीने सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. याच सत्याग्रह आंदोलनाच्या व्यासपीठावरून आज शेतकरी नेते गुरू अमानीत सिंग मांगत यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संदीप गिड्डेपाटील, अमनदीपसिंह धुम्मत, तेजवीर सिंह आदींची उपस्थिती होती. गुरू अमानीत सिंग मांगत पुढे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे आश्वासन दिले होते. पण सध्या शेतकऱ्यांचा खर्चच वाढला आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांनी प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके मुक्त केले पाहिजे. हे असहकार आंदोलनच ठरेल, असेही यावेळी स्पष्ट केले. प्रास्ताविक ॲड. श्रीकांत तराळ यांनी केले. संचालन नगरसेवक यशवंत झाडे यांनी केले तर आभार किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी मानले.