आधार होमिओपॅथी क्लिनिकचा दुसर्‍या शाखेचा शुभारंभ

    दिनांक :20-Feb-2021
|
नागपूर,
डॉ. अपर्णा आल्हाद सदाचार यांच्या ’आधार होमिओपॅथी क्लिनिकच्या’ दुसर्‍या शाखेचा उदघाटन सोहळा जयताळा येथील नव्या वास्तूत पार पडला. प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. आधारच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ 12 वर्षांपूर्वी याच मुहूर्तावर डॉ. डांगरे यांच्या हस्ते झाला होता. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी देखील प्रतिष्ठानाला भेट देऊन आशिर्वाद दिला. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या अनेक केंद्रीय पदाधिकारी उपस्थित होते.

nagpur _1  H x
 
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आल्हाद सदाचार यांनी केले. याप्रसंगी बोलतांना डॉ. डांगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात शिष्या म्हणून डॉ. अपर्णा यांच्या आजवरच्या कार्यप्रगतीवर प्रकाश टाकला आणि वैद्यकीय सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अविरत पोहोचवण्यासाठी कायम कार्यरत राहण्याचा संदेश दिला. प्रमिलाताई मेढे यांनी, सामाजिक जाणिवेचे भान ठेवून सातत्याने उत्तम रुग्णसेवा करावी असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय अश्विनी बुजोणे व ममता पोहनकर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन कल्याणी मोरोणे यांनी केले. आभार प्रदर्शनातून डॉ. अपर्णा सदाचार यांनी गुरूकडून झालेले कौतुक व मिळालेले आशीर्वाद व त्याचप्रमाणे प्रमिलाताईंकडून मिळालेले आशीर्वचन. तसेच रुग्णसेवेत, ’लक्ष अंत्योदय, प्रण अंत्योदय , पथ अंत्योदय’ या दीनदयाल उपाध्याय यांच्या संदेशावर पुढे मार्गक्रमण करण्याचा मानस व्यक्त केला.