विजयगोपालच्या अलाहाबाद बँकेला लिंक फेलचा आजार

    दिनांक :20-Feb-2021
|
- 6 महिन्यापासुन ग्राहकांना हेलपाट्या
तभा वृत्तसेवा
विजयगोपाल,
येथील अलाहाबाद बँकेला मागील सहा महिन्यापासुन लिंक फेल असल्या कारणाने कोणतेही कामे पार पडत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना व ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत समाविष्ट झाली तेंव्हापासुन या बँकेला लिंक फेलचा आजार जडला आहे. आता तर दिवस भर लिंक राहत नसल्याने शेतकर्‍यांना व ग्राहकांना दिवसभर आपले कामधंदे सोडुन लिंक यायची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे विजयगोपाल, इंझाळा, मलातपूर, तांभा, सावंगी येंडे, हिवरा, कांदेगाव, हिरापूर, रोहणी या गावातील लोकांना लिंक फेलमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
 
bank_1  H x W:
 
लिंक फेलमुळे कोणाचेही कोणतेही काम होत नाही. वारवांर तक्रार करुन सुद्धा दुरुस्ती होत नाही. त्यामुळे ग्राहक अलाहाबाद बँके बद्दल नाराजी व्यक्त करीत आहे. या ठिकाणी नवीन कोणतीही बँक द्या असा सुर प्रत्येक ग्राहक करीत आहे. 2019 मध्ये याच उपद्रवामुळे बँकेच्या शाखाधिकार्‍याला काळे फासले होते. त्यामुळे या बँकेत पुन्हा तीच परिस्थिती होण्याची चिन्ह दिसत आहे. याला मात्र बँक प्रशासन जबाबदार राहील अशी भावना ऐकायला येत आहे. लिंक फेलचा विषय मागील सहा महिन्यापासुन चालु असुन अजुन पर्यंत त्या फेल वरती बँक प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. जानेवारी पासुन शाखाधिकारी 15 फेब्रुवारीनंतर सर्व सुरळीत होईल असे सांगत आहे. पण आजही बँकेची तिच परिस्थिती आहे. दोन दिवसात लिंक फेलचा विषय मार्गी लावला नाही तर बँकेला कुलुप लावण्याच्या तयारीला लागलेले आहे. त्यामुळे वरिष्ठ बँक प्रशासनाने लिंक फेलच्या विषय मार्गी लावावा व ग्राहकाला होणारा मनस्तापा पासुन सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत समाविष्ट झाली असल्याने तांत्रिक बिघडामुळे लिंक फेलचा समस्या येत आहे. ती लवकरच दूर होईल असे अलाहाबाद बँकचे सहाय्यक शाखाधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले.